सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य शासन मार्फत निर्णय क्र.रागांयो-२०१६-प्र क्र.६४, भाग १, आरोग्य -६, दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हि दि.१ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु झाली होती त्यालाच महात्मा फुले आरोग्य योजना अशी म्हणतात. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नीकरण करून दोन्ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येते

महात्मा फुले आरोग्य योजना लाभार्थी

महात्मा फुले आरोग्य योजनाचा फायदा घेणेसाठी सदर लाभार्थी हा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आलेल्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक असणे बदंकरक आहे , राशन कार्ड असणारा आणि त्यांचे उत्पन्न वार्षिक जास्तीत जास्त रु.१ लाखापर्यंत कुटुंबे असणारे कुटुंबे या योजनेचा फायदा घेऊ शकतात

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत कोणते उपचार घेता येते

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ३० विशेष सेवांतर्गत ९७१ प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया करता येते त्याच प्रमाणे १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. सदर योजनेत खालीलप्रमाणे विशेष उपचार देण्यात येते.

  • त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
  • नेत्ररोग शस्त्रक्रिया
  • नेफ्रोलोजी
  • इंटरवेन्शनल रेडीओलोजी
  • इंडोक्रायनोलोजी
  • कर्करोग शस्त्रक्रिया
  • अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
  • काम, नाक घसा शस्त्रक्रिया
  • कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
  • चर्मरोग चिकित्सा

  • जनरल मेडिसिन
  • जळीत
  • जोखिमी देखभाल
  • पॉलिट्रामा
  • पोठ व जठार शस्त्रक्रिया
  • न्युरोलोजी
  • पल्मोनोलोजी
  • प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया
  • प्रोस्थेसिस
  • बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
  • बालरोग शस्त्रक्रिया
  • मज्जातंतूविकृती शास्त्र
  • रोमेटोलोजी
  • वैद्यकीय कर्करोग उपचार
  • स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र
  • हृदयरोग
  • सर्वसाधारण शस्त्रक्रिया
  • संसर्गजन्य रोग
  • मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
  • रेडीओथेरपी कर्करोग

महात्मा फुले आरोग्य योजना विमा संरक्षण किती आहे

महात्मा फुले आरोग्य योजना व त्याचा लाभ कुटुंबाला प्रतिवर्ष रुपये १.५० लाखापर्यंतचे आहे तर मूत्रपिंड ( किडनी ) प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष २.५० लाखापर्यंत दिला आहे

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अधिक माहिती हि सरकारी वेब साईट https://www.jeevandayee.gov.in/ या ठीकानी मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *